Ads

--

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा..

By Xtralarge News

December 17, 2023 12:46 pm

Ads

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा..

नागपूर, दि. १७ डिसेंबर :-

हिवाळी अधिवेशन विदर्भात होत असून विदर्भातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी किमान दोन दिवस वाढवावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

 

मुंबई येथे विधानभवनात २९ नोव्हेंबर, २०२३ रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली होती. या बैठकीत दिनांक १९ डिसेंबर, २०२३ रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन अधिवेशन कालावधी वाढविण्याबाबत चर्चा करण्यात येईल, असा सर्वानुमते निर्णय झाला होता, त्याप्रमाणे निर्णय घ्यावा, अशी विनंती वडेट्टीवार यांनी केली आहे.

 

No comments to show.

Leave a Comment