Ads

--

बाप रे, एकाच दिवशी ९० हजार कोरोना रुग्ण!

By Xtralarge News

September 6, 2020 2:34 pm

Ads

नवी दिल्ली: ६ सप्टेंबर २०२०:

कोरोनाचे संक्रमण कमी होताची काही लक्षणे दिसत नाहीत. दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. रविवारी भारतात एकाच दिवसांत ९० हजार करोनाबाधित आढळले आहेत.  आतापर्यंतची ही एका दिवसांतील सर्वात मोठी वाढ आहे या नवीन करोनाबाधितांच्या संख्येमुळे आता भारतात ४१ लाखांहून अधिक करोनाबाधितांची संख्या झालेली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील २४ तासांत ९० हजार ६३३ इतके बाधित आढळले. तर, १०६५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत ७० हजार ६२६ जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतात आतापर्यंत ३१ लाख ८० हजार ८६५ करोनाबाधितांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत समाधानकारक आहे. भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर हा ७१.२३ टक्के आहे. कोविडबाधितांची संख्या वाढत असताना मृतांचे प्रमाण मात्र कमी होत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.

मात्र ज्या वेगाने रुग्णांची संख्या वाढत आहे हे पाहता एका दिवसात १ लाख रुग्ण कोरोना बाधित सापडण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment