Ads

-

‘राष्ट्र प्रथम’ भावना जागृत करणारे अभियान.

By Xtralarge News

October 27, 2023 12:00 pm

Ads

‘राष्ट्र प्रथम’ भावना जागृत करणारे अभियान.

मुंबई, दि. २७ ऑक्टोबर :

देशातील १८५ वीर अमर जवानांच्या गावी जावून त्यांच्या अंगणातील पवित्र माती कलशात एकत्र करणाऱ्या व राष्ट्रभक्तीतून जगावेगळी धडपड करणाऱ्या उमेश गोपीनाथ जाधव या छत्रपती संभाजी नगरच्या तरुणाचा उपक्रम अभिनंदनीय, प्रेरणादायी आणि अनुकरणीय असून “मेरी माटी, मेरी देश” या विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभियानाला मिळत असलेला प्रतिसाद “राष्ट्र प्रथम” ही भावना जागृत करण्यास प्रेरक ठरत आहे, असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

उमेश जाधव यांच्याकडून एकत्रित अमर जवानांच्या गावातील माती कलशाचे पूजन व अभिवादन करून मुनगंटीवार यांनी त्यांच्या मलबार हिल येथील शासकीय निवासस्थानाहून दिल्लीकडे रवाना केली, यावेळी ते बोलत होते.

मुनगंटीवार यावेळी म्हणाले, “मेरी माटी, मेरा देश” या अभियानास देशभरात उत्तम प्रतिसाद मिळत असून सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील एक हजार कुंभ घेऊन शुक्रवारी तरुण बांधव मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात एकत्र जमणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील उमेश जाधव यांनी एक लाख 30 हजार किलोमीटर प्रवास करून, अमर जवानांच्या गावी जाऊन माती एकत्र केली हे देशभक्तीचे अनोखे उदाहरण आहे. या त्यांच्या उपक्रमात सहभागी होताना विशेष अभिमान वाटत आहे.

 

No comments to show.

Leave a Comment