Ads

--

लोकसभेला महायुतीचे ४५ + फिक्सच !

By Xtralarge News

October 22, 2023 6:17 pm

Ads

लोकसभेला महायुतीचे ४५ + फिक्सच !

मुंबई, दि. २२ ऑक्टोबर;

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या दोन महिन्यात महाराष्ट्रातील २१ लोकसभा मतदारसंघात महाविजय २०२४ निमित्तानं हरघर संपर्क अभियान राबविलं आहे. आतापर्यंतच्या प्रवासाचा गोषवारा देणारं ट्विट त्यांनी आज केलं आहे. त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ३३ हजार ७१० मतदारांशी संवाद साधून पंतप्रधानपदाबद्दल प्रश्न विचारला, त्यापैकी ३३ हजार ६९७ मतदारांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पसंती दिली तर फक्त चौघांनी राहुल गांधींना समर्थन दिलं आहे.

‘महाविजय २०२४ संकल्प यात्रेच्या’ निमित्तानं आतापर्यंत २१ लोकसभा मतदारसंघात प्रवास केला. या प्रवासात ३३ हजार ७१० नागरिकांशी थेट संवाद साधला आणि पंतप्रधान म्हणून कुणाला पसंती द्याल? असा प्रश्न विचारला. त्यापैकी ३३ हजार ६९७ लोकांनी पंतप्रधान म्हणून आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांना पसंती दिली; व केवळ १३ लोकांनी इतर पक्षातील नेत्यांना पसंती दिली. त्यातील फक्त चौघे राहुल गांधी समर्थक होते.

 

गेल्या साडेनऊ वर्षांत नरेंद्र मोदीजींनी केलेला विकास, जगभरात उंचावलेली भारताची मान, आत्मनिर्भर भारतासाठी केलेला संकल्प यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेने मोदीजींच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील जनतेच्या याच प्रेमाच्या बळावर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे ४५ हून अधिक खासदार निवडून येतील हा ठाम विश्वास आहे. ‘फिर एक बार मोदी सरकार’.

 

No comments to show.

Leave a Comment