संजय शिरसाटांनी क्षमतेत बोलावे!
मुंबई, दि. ८ ऑक्टोबर :-
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपा विधान परिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चांगलेच कान टोचले आहेत. संजय शिरसाट यांनी आपल्या क्षमतेत बोलावे, असा सल्ला दरेकर यांनी दिला आहे.
आमदार दरेकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्लीला जावे की महाराष्ट्रात राहावे हे सुचविण्याचा अधिकार संजय शिरसाट यांना नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या क्षमतेत बोलावं, मी औकातीत बोलत नाही. कारण ते आपल्या सहयोगी पक्षाचे आमदार आहेत. आमचे दिल्लीचे नेतृत्व सक्षम आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात राहायचे की दिल्लीत जायचे ते ठरवतील. परंतु आम्हा कार्यकर्त्यांना देवेंद्र महाराष्ट्रातच हवेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचीही इच्छा आहे त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, महाराष्ट्राला विकासाकडे न्यावे.
आज महाराष्ट्रावर अनेक संकटे आहेत. एकत्रितपणे सरकारने सामोरे जाण्याची आवश्यकता आहे. अशावेळेला महायुतीतील वातावरण कलुशीत होणार नाही याची काळजी महायुतीतील नेत्यांनी घेतली पाहिजे व रोज टीव्हीवर येऊन बोलणाऱ्यांनी तर घेतलीच पाहिजे, असा सल्लाही दरेकर यांनी दिला आहे.
Leave a Comment