Ads

-

गोरेगाव दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख..

By Xtralarge News

October 6, 2023 8:07 pm

Ads

गोरेगाव दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख..

मुंबई, दि. ६ ऑक्टोबर:-

गोरेगावच्या उन्नत नगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेतील मृत व त्यांच्या कुटुंबियांच्याप्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहवेदना प्रकट केली आहे. या मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

भीषण आगीमध्ये जखमी झालेल्या नागरिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर येथे जाऊन आस्थेने विचारपूस केली. यावेळी डॉक्टरांकडून त्यांनी या जखमींवर सुरू असलेल्या उपचारांची देखील माहिती घेतली. तसेच या सर्वांवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार होत आहेत आहेत अथवा नाही याची माहिती घेऊन त्यांच्यावर लागतील ते सर्व उपचार करावेत त्यांची योग्य वैद्यकीय काळजी घ्यावी असे निर्देश डॉक्टराना दिले.

या दूर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांप्रति मुख्यमंत्री शिंदे यांनी सहवेदना व्यक्त केली तसेच या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटूंबियांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात यावी तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात यावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

 

No comments to show.

Leave a Comment