Ads

-

अमित शाहांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन..

By Xtralarge News

September 24, 2023 6:08 pm

Ads

अमित शाहांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन..

मुंबई, दि. २३ सप्टेंबर :

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्यांच्यासोबत होते.

शाह यांनी सपत्नीक लालबागच्या राजाची पूजा केली. यावेळी लालबाग राजा गणेश मंडळाच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी, खजिनदार मंगेश दळवी यांनी त्यांचे स्वागत आणि सत्कार केला. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार आशीष शेलार, विनोद तावडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी शाह यांचे गणेश मूर्ती शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा सौ. वृषाली शिंदे यांनी श्री. शाह यांचे औक्षण केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन हे उपस्थित होते. मुंबईतील वांद्रे पश्चिम मधल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने स्थापन केलेल्या श्रीगणेशाचे दर्शन घेतले.

No comments to show.

Leave a Comment