Ads

--

OBC आरक्षणाला धक्का न लावता मराठयांना आरक्षण द्या!

By Xtralarge News

September 5, 2023 5:08 pm

Ads

OBC आरक्षणाला धक्का न लावता मराठयांना आरक्षण द्या!

नागपूर, दि ५ सप्टेंबर :

मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यायचे असेल तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या अशी स्पष्ट भूमिका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे. नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवार बोलत होते.

ओबीसींच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडताना वडेट्टीवार म्हणाले, ओबीसींची लोकसंख्या ५२ टक्क्यांहून अधिक आहे आणि त्यांना मिळणारे आरक्षण २७ टक्के आहे. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसींच्या आरक्षणाच्या टक्केवारीमध्ये वाढ करावी. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचं नुकसान होऊ नये. विरोधीपक्षनेते यांनी अधोरेखित केले.

ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली ओबीसी समाजाचे आरक्षण वाढवून त्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा दर्शवला असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण महाविकास आघाडी टिकवू शकले नाही या टीकेला उत्तर देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, उपसमितीत एकनाथ शिंदे, अजित पवार हे सदस्य होते, तेव्हा ते काय करत होते, सत्तेत असताना आक्रमक भूमिका का मांडली नाही? असा सवाल करत मराठा समाजाच्या डोळ्यात महायुती सरकार धूळफेक करत असल्याची टीका विरोधी पक्षनेत्यांनी केली.

आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करा असे आदेश आम्ही देऊ शकतो का? आमच्या तिघांपैकी कोणी आदेश दिल्याचे सिद्ध झाले तर आम्ही राजकारणातून बाजूला होऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होते. यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी सगळ्यांची नार्को टेस्ट घ्या अशी मागणी देखील केली.

No comments to show.

Leave a Comment