Ads

---

I.N.D.I.A. ची बैठक म्हणजे श्वापदांची टोळी !

By Xtralarge News

August 31, 2023 3:24 pm

Ads

I.N.D.I.A. ची बैठक म्हणजे श्वापदांची टोळी !

मुंबई, दि. ३१ ऑगस्ट ;

मुंबईत होणारी इंडियाची बैठक नाही तर ‘घमेंडिया‘ची बैठक आहे. उद्धव ठाकरे ज्याला ‘गरूड झेप‘ म्हणत आहात ती गरुड झेप नाही. मोदी यांना बदनाम करण्यासाठी, त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी तयार झालेली श्वापदांचा टोळी आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमच्या याच टोळीने शंभर कोटी वसुली केली, करोना काळात कोट्यवधीची कंत्राट घशात घातली. मृतदेहांसाठीच्या बॅगही त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

 

बावनकुळे पुढे म्हणाले की, तुम्ही लालूप्रसाद यादवांच्या माध्यमातून मोदींच्या ‘नरड्यावर बसण्याचं स्वप्न‘ बघा. पण जनता तुमच्या छाताडावर बसेल. तुम्ही मोदींना जेवढ्या शिव्या द्याल जनता मोदींवर तेवढं जास्त प्रेम करेल.

महात्मा गांधीजींनी ‘क्विट इंडिया‘चा नारा याच मुंबईतून दिला होता. त्यांच्या नाऱ्यामुळे इंग्रजांना देशातून जावं लागलं. आता पुन्हा एकदा तोच ‘क्विट इंडिया‘चा नारा देऊन तुमच्या सारख्या भ्रष्ट प्रवृत्तींना जनता कायमचं घरी बसवणार आहे. नरेंद्र मोदी यांचा तुमच्या (I.N.D.I.A.) विरोधातील संघर्ष हा स्वतःचं कुटुंब वाचवण्यासाठी नाही तर देश वाचविण्यासाठी आहे. तुम्ही तुमचा ‘परिवार बचाव ‘ अजेंडा घेऊन बैठका करा. कोट्यवधी देशवासीयांच्या स्वप्नपूर्तीचा अजेंडा घेऊन मोदींचे देशसेवेचं कार्य अखंड सुरू आहे.

No comments to show.

Leave a Comment