Ads

--

मणिपूर सरकार त्वरित बरखास्त करा !

By Xtralarge News

July 22, 2023 1:08 pm

Ads

मणिपूर सरकार त्वरित बरखास्त करा !

मुंबई, दि. २२ जुलै :-

मणिपुर मध्ये घडलेल्या निंदनीय घटनेचा तीव्र निषेध करीत देशाचे महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे मणिपुर सरकार त्वरित बरखास्त करण्याची मागणी माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांनी केली.

 

नसीम खान विधानभवनात पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले की, ज्याप्रमाणे मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत आहे, लोकांच्या हत्या होत आहे, हजारो लोक बेघर झालेले आहेत आणि तेथील रहिवाशी दहशतीच्या खाली आपले जीवन जगत आहे अशी परिस्थिती असतानाही केंद्रातील मोदी सरकार गेल्या तीन महिन्यापासून घडत असलेली घटना एक मुकदर्शक म्हणून बघत असुन त्या ठिकाणी शांतता बहाल करण्यासाठी कसल्याही प्रकारचे काम करत नसल्यामुळे आणि कशाप्रकारे महिलांना निर्वस्त्र करून त्यांच्या अत्याचार होत असल्याची घटना पाहून देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनात मोदी सरकार विरुद्ध तीव्र नाराजगी आहे म्हणून देशाच्या महामहिम राष्ट्रपती यांनी स्वतः हस्तक्षेप करून मणिपूर मधील भाजपा सरकार त्वरीत बरखास्त करावी आणि तेथे शांतता बहाल करण्यासाठी योग्य ते पावले उचलावी अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे.

No comments to show.

Leave a Comment