Ads

--

विरोधकांच्या निशाण्यावर आता नीलम गोऱ्हे !

By Xtralarge News

July 17, 2023 5:18 pm

Ads

विरोधकांच्या निशाण्यावर आता नीलम गोऱ्हे !

मुंबई, दि. १७ जुलै.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी निलम गोऱ्हे यांच्या पक्षांतरावर प्रश्न उपस्थित केला. शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित करत त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही असे म्हटले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सरकारी पक्षाची बाजू लावून धरली.

डॉ. नीलम गोऱ्हे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्यावतीने विधानपरिषदेवर पाठवलेल्या प्रतिनिधी आहेत, त्यांना पक्षातर्फे निलंबनाची नोटीस पाठवली असता त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. तर ज्यावेळेला अध्यक्ष किंवा सभापती, उपसभापती या घटनात्मक पदावर अविश्वास दाखवला जातो, त्यावेळेस त्या खुर्चीवर बसण्याचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार नाही. जोपर्यंत डिसक्वालिफिकेशन नोटीसचा निर्णय होत नाही तोपर्यंत उपसभापतींनी त्या खुर्चीवर बसू नये, अशी सर्व आमदारांनी भूमिका घेतली आहे, असे माजी मंत्री उद्धव गटाचे नेते अनिल परब यांनी म्हटले आहे.

नील गोऱ्हेंच्या प्रकरणी विरोधी पक्षाचे नेते राज्यपाल रमेश बैस यांना भेटले व त्यांना पदावरून हटविण्यात यावे अशी मागणी केली आहे.

No comments to show.

Leave a Comment