Ads

---

पावसाळी अधिवेशनासाठी हिरकणी कक्ष सज्ज..

By Xtralarge News

July 16, 2023 3:10 pm

Ads

पावसाळी अधिवेशनासाठी हिरकणी कक्ष सज्ज..

मुंबई, दि. १६ जुलै :

पावसाळी अधिवेशनासाठी हिरकणी कक्ष अद्यावत करून सुविधा देण्याविषयी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी सूचना केल्या होत्या त्यानुसार विधानभवनात हिरकणी कक्ष अद्यावत करण्यात आला असून माता व बालक यांना स्तनपानासाठी अद्यावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हिरकणी कक्ष साकारण्यात आला.

 

विधान भवन येथील हिरकणी कक्ष (पहिला मजला), नवजात शिशुचें संगोपन व त्यांच्या मातांना एक हक्काचे ठिकाण म्हणून सुसज्ज झाले आहे. आरोग्यसेवा आयुक्त व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार, अति. जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. सुनीला लाळे आणि त्यांच्या टीम ने मिळून सर्व आवश्यक साधनसामुग्री केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून विधान भवन चे सचिव श्री जितेंद्र भोळे व कक्ष अधिकारी श्री विजय काळे यांच्याशी समन्वय साधून सदर हिरकणी कक्ष अद्यावत केले आहे.

 

आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ.स्वप्नील लाळे, डॉ. नितीन आंबाडेकर यांचे मार्गदर्शनाखाली हा हिरकणी कक्ष अतिशय चांगल्या रीतीने सुविधांसह सज्ज करण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून पावसाळी अधिवेशनासाठी हा हिरकणी कक्ष आवश्यक सुविधेसह व सर्व माहितीसह सुसज्ज करण्यात आला आहे.

No comments to show.

Leave a Comment