Ads

--

मोदींच्या नेतृत्त्वावर NCP च्या नेत्यांनाही विश्वास !

By Xtralarge News

July 3, 2023 12:20 pm

Ads

मोदींच्या नेतृत्त्वावर NCP च्या नेत्यांनाही विश्वास !

मुंबई, दि. ३ जुलै ;

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर मार्गक्रमण करत आहे. त्यांनी भारताला जगात सर्वोत्कृष्ठ देश निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. हेच विकासपर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे नेत आहेत. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला अशी प्रतिक्रीया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे..

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आपल्या सहका-यांसह भाजपाप्रणित शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर बावनकुळे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी ४० आमदारांसह सरकारमध्ये येण्याचा निर्णय घेतला, ही आनंदाची बाब आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तसेच त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे महाराष्ट्र व देशाला नवी ऊभारी मिळाली आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात प्रचंड ताकदवान भारत निर्माण करण्याकरिता हे मोठं पाउल आहे, राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री आहेत. ..या सर्वांचे मनापासून अभिनंदन.

 

No comments to show.

Leave a Comment