Ads

-

अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करा :

By Xtralarge News

May 29, 2023 9:41 pm

Ads

अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करा :

मुंबई, दि. २९ मे  :

आरे स्टॉल समोर अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांच्या होणा-या त्रासामुळे लोकांना नाहक अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे लक्षात घेता अनाधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर तत्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात कुर्ला (पश्चीम) एल वॉर्ड येथे आज ६८९ तक्रारी प्राप्त झाल्या असून जागीच १३० तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरीत तक्रारी देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणा-या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी ३ ते 5.30 वाजता सूरू राहणार आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकते.

 

 

No comments to show.

Leave a Comment