राज्यात शनिवारी भाजपाच्या वतीने आंदोलन
लोणी, दि.२८ ऑगस्ट:
राज्यात मंत्रालय ते माॅल सुरू करण्यासाठी सरकार निर्णय घेते मग मंदीर सुरू करण्यातच दिरंगाई का ॽ असा सवाल माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित करून
मंदीरांची दारे उघडावित या मागणीसाठी आयोजित केलेल्या आंदोलनाला पाठींबा कार्यकर्त्यानी गावातील मंदीरांसमोरच घंटानाद करावा असे आवाहन त्यांनी केले.
आ.विखे पाटील यांनी म्हणले आहे की,राज्यात सर्वच व्यवसाय सुरू करण्याचे निर्णय सरकारने घेतले. मात्र मंदीर उघण्याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने राज्यातील तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेले व्यवसाय मागील पाच महीन्यांपासून बंद आहेत. या परिसरातील अर्थचक्र अडचणीत आल्याने,व्यावसायिकांना दिलासा मिळावा म्हणून राज्यातील मंदीर सुरू करण्याची मागणी अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्ती,भाविक आणि व्यावसायिकांनी सातत्याने करूनही सरकार निर्णय घेत नाही हे दुर्दैव असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील असंख्य देवस्थान बंद असल्याने तेथील व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान होत असून,या परिसराची अर्थिक घडी उध्वस्त होवू लागली आहे.याबाबतचे गांभीर्य राज्य सरकारने यापुर्वीच लक्षात घ्यायला हवे होते.परंतू वारंवार मागणी करूनही राज्यातील मंदीर सुरू करण्यात राज्य सरकार दिरंगाई का करते असा सवाल उपस्थित करून आ.विखे पाटील म्हणाले की,मंत्रालयापासून ते माॅल उघण्यापर्यतचे सर्व निर्णय सरकार घेते.आता राज्यात बससेवा सुरू झाली. लोकांचे ठप्प झालेले जनजीवन सुरू होत असताना फक्त मंदीरांबबातच सरकार एवढी आडमुठेपणाची भूमिका का घेतेॽ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.मंदीराच्या व्यवस्थापनाला काही नियम अटी घालून दिल्यास त्याचे पालन करून भाविकांना मंदीरात प्रवेश देण्याचे नियोजन होवू शकते.सर्वच मंदीरात आॅनलाईन दर्शन सुविधा आहेत त्याचाही उपयोग भाविकांना होईल ही सर्व वस्तूस्थिती असतानाही राज्य सरकार जाणीवपुर्वक करीत असलेल्या दिरंगाईमुळे तिर्थस्थान असलेल्या गावातील व्यावसायिक, भाविक, अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांच्या भावना सरकारच्या विरोधात अतिशय तीव्र झाल्या असल्यानेच आता थेट रस्त्यावर उतरून मंदीरांची दार उघडण्याची मागणी करावी लागत असल्याचे आ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकारच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीच्या वतीने शनिवार दि.२९ आॅगस्ट २०२० रोजी राज्यात सर्व प्रमुख मंदीरापुढे सकाळी ११ वाजता ‘दार उघड उध्दवा दार उघड’ हे आंदोलन आयोजित केले असून,या आंदोलनाला पाठींबा म्हणून प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी, वारकरी आणि अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीनी या आंदोलनाला पाठींबा म्हणून गावातील मंदीरांसममोरच घंटानाद करून सोशल डिस्टसिंग आणि मास्क वापरून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.









