Ads

--

मुंबईत ५०० ठिकाणी सामूहिक हनुमान चालीसा पठण..

By Xtralarge News

April 7, 2023 5:17 pm

Ads

मुंबईत ५०० ठिकाणी सामूहिक हनुमान चालीसा पठण..

मुंबई, दि. ७ एप्रिल :
‘जय हनुमान ज्ञान गुणसागर… जय कपिस तिहुँ लोक उजागर…’, ‘बोल बजरंग बली की जय’असा जयघोष करीत हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने मुंबई भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनात शहरातील ५०० हून अधिक ठिकाणी सामुहिक हनुमान चालीसा पठण पार पडले. पर्यटन मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मलबार हिल येथील हनुमान मंदिरात भक्तिभावे पूजा करण्यात आली. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मुंबई भाजयुमो अध्यक्ष तजिंदर सिंग तिवाना आणि मुंबई भाजयुमो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

सामूदायिक हनुमान चालिसा पठणाने भावभक्तीचा महोत्सव शहर उपनगरात अनुभवायला मिळाला. या निमित्ताने ‘भीमरुपी महारुद्र…’ या स्तोत्राचेही सामुदायिक पठण झाले. यामध्ये तरुणांचा उत्साह विलक्षण होता. शहरातील अनेक पारंपरिक मंदिरातही जन्मोत्सवाच्या निमित्ताने भजन किर्तन सादर करण्यात आले. आजच्या युगात तरुणांसाठी शक्तीची देवता असलेल्या हनुमानाची उपासना आंतरिक बळ आणि ऊर्जा देणारी आहे. भगवान हनुमान आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी मिळवून देवो त्यांची कृपादृष्टी राज्यावर कायम राहो अशी प्रार्थना पर्यटन मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केली.

 

No comments to show.

Leave a Comment