Ads

--

भगतसिंग कोश्यारींचे वक्तव्य राजकीयदृष्ट्या प्रेरित !

By Xtralarge News

February 22, 2023 11:57 am

Ads

भगतसिंग कोश्यारींचे वक्तव्य राजकीयदृष्ट्या प्रेरित !

मुंबई दि. २२फेब्रुवारी –

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पायउतार झाल्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. त्यांचे वक्तव्य राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केले आहे.

वास्तविक राज्यपाल पदाची जबाबदारी स्वीकारल्यावर भारतीय राज्यघटनेचे संरक्षण करणे, राज्य शासनास वेळोवेळी मार्गदर्शन करणे अशा अनेक गोष्टी भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून अपेक्षित होत्या. परंतु सरकार स्थापनेचे निमंत्रण न देताच एकनाथ संभाजी शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला, याचा खुलासा आरटीआयमधून झालेला आहे असेही महेश तपासे म्हणाले.

 

No comments to show.

Leave a Comment