Ads

-

पत्रकार वारिसेंच्या कुटुंबियांना शासनाकडून २५ लाखांची मदत..

By Xtralarge News

February 12, 2023 6:48 pm

Ads

पत्रकार वारिसेंच्या कुटुंबियांना शासनाकडून २५ लाखांची मदत..

रत्नागिरी,दि. १२ फेब्रुवारी :

पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबातील त्यांचा एक मुलगा आणि आजी यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून संपूर्ण महाराष्ट्रातून करण्यात येत होती.

रत्नागिरीत रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत येथील पत्रकारांनीही पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, ही मागणी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पुन्हा मांडली. पत्रकारांच्या या मागणीची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख व इतर माध्यमातून 15 लाख अशी मदत मयत पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. याची घोषणा पालकमंत्री सामंत यांनी आज येथे केली. याशिवाय वारिसे यांच्या मुलाला कायमची नोकरी देण्याची जबाबदारीही सामंत यांनी स्वीकारली आहे.

No comments to show.

Leave a Comment