Ads

--

महाड दुर्घटना: सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा.

By Xtralarge News

August 25, 2020 9:59 am

Ads

छोट्या मोठ्या शहरातील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा – प्रवीण दरेकर यांची मागणी

महाड इमारत दुर्घटना स्थळी तातडीने भेट..

मुंबई : 25 ऑगस्ट:

महाड इमारत दुर्घटना स्थळाला तातडीने भेट देऊन राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रात्री उशिरा याठिकाणी पाहणी केली. जखमी तसेच मृत्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी अशा दुर्घटना टाळण्यासाठी छोट्या मोठ्या शहरातील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची मागणी केली.

ही 5 मजली इमारत 2011 मध्ये बांधली होती. त्यामध्ये 47 फ्लॅट होते. या दुर्घटनेत आतापर्यंत 30 लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले असून अजून किमान 50 जण दबले असण्याची शक्यता आहे.

यावेळी मीडियाशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी सांगितले की,
“आतापर्यंत मुंबई सारख्या मोठ्या शहरात इमारत पडण्याचे प्रकार घडत होते. पण आता छोट्या शहरातही इमारत पडून शेकडो लोकांना जीव गमवावा लागला. ही अत्यन्त धोकादायक स्थिती आहे. या घटनेला जबाबदार असणारे बिल्डर, कंत्राटदार, आर्किटेक्ट, अधिकारी सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे. पण राज्यभरातील मोठ्यासह छोट्या शहरातही धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले पाहिजे” अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारकडे केली.

No comments to show.

Leave a Comment