Ads

-

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविकांचे आंदोलन मागे.

By Xtralarge News

January 5, 2023 3:24 pm

Ads

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविकांचे आंदोलन मागे.

मुंबई, दि. ५ जानेवारी :-

अंगणवाडी सेविकांच्या न्याय मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल, त्यांना दिलासा मिळेल असेच प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने त्यांचे आंदोलन मागे घेतले.

आंदोलकांच्या शिष्टमंडळांने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे तपशीलवार ऐकून घेतले. या सर्व मुद्यांबाबत लवकरच व्यापक बैठक बोलावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या बैठकीत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्याचे निश्चित करण्यात आले. यात अंगणवाडी केंद्रांसाठीची जागा, सेविका आणि मदनतीस यांचे मानधन, रिक्त जागा, ऑनलाईन डाटा भरण्यासाठी मोबाईलची उपलब्धता, पोषण आहार आदी मुद्यांचा समावेश असेल.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या सकारात्मक आणि दिलासादायक प्रतिसादामुळे आंदोलन मागे घेत असल्याचे संघाचे अध्यक्ष एम. एम. पाटील यांनी जाहीर केले. यावेळी शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांबाबचे सविस्तर निवेदनही मुख्यमंत्र्यांना सादर केले.

No comments to show.

Leave a Comment