Ads

--

मंत्रालयातील बोगस भरती प्रक्रियेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा.

By Xtralarge News

December 30, 2022 7:45 pm

Ads

मंत्रालयातील बोगस भरती प्रक्रियेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा.

नागपूर, दि. ३० डिसेंबर :-
मंत्रालयात ‘क’ संवर्गातील लिपिकवर्गीय पदांची भरती सुरु असल्याचे खोटे सांगून मंत्रालयातील शिपाई पदावरील काही कर्मचाऱ्यांनी बोगस भरतीप्रक्रिया राबवली. मंत्रालयात उपसचिवांच्या दालनातच झालेल्या या बनवेगिरीची सखोल चौकशी करावी व दोषींना शिक्षा करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला.

या कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांच्या दालनात उमेदवारांच्या बोगस मुलाखतींचं नाटक घडवून आणलं. यातून अनेक युवकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे, त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी अजित पवार यांनी केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगितले. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भूमिका तपासण्यात येईल, असे त्यांनी उत्तरादाखल सांगितले.

No comments to show.

Leave a Comment