Ads

---

कर्नाटकने आरे केले तर आम्ही ही कारेने उत्तर देऊ..

By Xtralarge News

December 3, 2022 6:31 pm

Ads

कर्नाटकने आरे केले तर आम्ही ही कारेने उत्तर देऊ..

मुंबई,दि. ३ डिसेंबर:
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर दोन्ही बाजूने तणावाचे होऊ नये अशी आमची भूमिका आहे. महाराष्ट्राचा पहिला अधिकार त्या गावांवर आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात त्यावर भूमिका स्पष्ट आहे. शिंदे सरकार त्या भागामध्ये अनेक योजना पोहोचवणार आहे. जत भागात पाण्याच्या संदर्भातील योजना पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रश्न सामंजस्याने सुटला पाहिजे. कुणी अरे केले तर आम्ही कारे करू, असे मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार म्हणाले..

कर्नाटकच्या बाजूने कुठल्याही प्रकारचा आक्रमकपणा झाल्यास आम्ही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातून त्याला उत्तर देऊ..कुणालाही कुठेही जाण्याची परवानगी आहे महाराष्ट्रातील मंत्री तिथे जाणार असतील तर त्यांना कोणी थांबवू शकणार नाही.

उद्धव ठाकरे यांच्या मनातील मुख्यमंत्री या प्रश्नावर उत्तर देताना शेलार म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या मनात काय आहे हे मोजण्यासाठी मी एवढा मनकवडा नाही. मला मा. उद्धव ठाकरे यांची घोषणा माहित आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी आहे त्यावरुन तुम्ही काय समजायचे ते समजा.

सेस इमारतीतील पुनर्विकासाला वर्षानुवर्षे वर्षात खीळ पडली होती. त्या समस्येतून दूर करण्याचे काम शिंदे- फडणवीस सरकारने केले आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केला. राष्ट्रपती यांचे अनुमती मिळवून नवीन कायदा आला. मुंबईकरांच्या दिवाळीचा सण व्हावा असा हा निर्णय आहे. संक्रमण शिबिराची अवस्था वाईट होत्या. राहतो तिथेच सोय होणार. आता सर्व जबाबदरी सरकार घेणार आहे. कालमर्यादा स्पष्ट झाली आहे. भाडेकरू आणि विक्री घटकातून मालकांना हिस्सा मिळणार आहे. मालकांची दादागिरी आता संपणार आहे. सेस इमारतीतील मालकांची दादागिरी आता संपली. भाडेकरूच्या पुनर्विकासाचा मार्ग सरकारी राजमार्गाने मोकळा केला. मुंबईकरांचा आणि विशेषता भाडेकरूनचा दिवाळीचा दिवस असावा असा निर्णय झालेला आहे.

No comments to show.

Leave a Comment