Ads

--

काँग्रेसच्या कार्यालयात संविधान दिनानिमित्त ‘संविधान प्रस्ताविका’ वाचन.

By Xtralarge News

November 26, 2022 4:51 pm

Ads

काँग्रेसच्या कार्यालयात संविधान दिनानिमित्त ‘संविधान प्रस्ताविका’ वाचन…

मुंबई, दि. २६ नोव्हेंबर :

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संविधान दिनानिमित्त मुंबईतील टिळक भवन येथील पक्ष कार्यालयात “भारतीय संविधान”च्या प्रस्ताविकेचे वाचन प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकिम यांनी केले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनतेला संविधानाच्या माध्यमातून धर्मनिरपेक्ष व सामाजिक एकात्मतेचे अधिकार दिले. आर्थिक, राजनैतिक न्याय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाही गणराज्य घडविणारी घटना संसदेत सादर केली. यावेळी संविधानाच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करण्यासाठी परिश्रम करण्याची शपथ घेण्यात आली. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, राजेश शर्मा, डॉ. गजानन देसाई, नामदेव चव्हाण या सहकाऱ्यांसह उपस्थितांनी शपथ घेतली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान दिले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने ते स्वीकारले आणि २६ नोव्हेंबर १९५० पासून ते लागू करण्यात आले. संविधान साकारणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी ‘संविधान दिन’ साजरा केला जातो. काँग्रेस पक्ष लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी कटीबद्ध असून लोकशाही व संविधान टिकले तरच आपले स्वातंत्र्य अबाधित राहिल, अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.

 

No comments to show.

Leave a Comment