Ads

---

दया, कुछ तो गडबड है !

By Xtralarge News

August 21, 2020 8:27 pm

Ads

कोविड केअर सेंटर उभारणीत भ्रष्टाचार.

मुंबई, दि. २१ ऑगस्ट २०२०

कोरोनाच्या संकटातही संधीचा गैरफायदा घेत वाहत्या गंगेत हात धुवून घेतले जात आहेत. एकीकडे खाजगी हॉस्पिटल्स भरमसाठ बिल करुन रुग्णांना लूटत आहेत तर काहीजण मास्क, पीपीई की,ट सॅनिटायझरमध्ये हात मारत आहेत. त्यात आता आणखी एका लुटमारीची भर पडली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत राज्य सरकारने प्रत्येक भागात कोविड केअर सेंटर उभारण्याचे काम हाती घेतले आहे. पण ही कोविड केअर सेंटरही मलिदा लाटण्याचे नवे अस्त्र झाल्याचे दिसत आहे.

मुंबईतील कोविड केंद्र उभारण्याच्या कामात गडबड घोटाळा झाला आहे असा आरोप भाजपा व मनसेने करुन राळ उडवून दिली आहे.

भाजप आ. आशिष शेलार यांनी ट्विट करत “महापौरांच्या मुलालाच कोविड सेंटरमधील मलिद्याचे कंत्राट. शिवसेनेच्या नगरसेवकांना ५३५.९५ कोटींचा निधी. वा! मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची “प्रिपेड” समाजसेवा जोरात! इथे मुंबईकर कोविडच्या महामारीत मृत्यूशी झुंज देत आहेत आणि सत्ताधारी कंत्राटदारांसोबत तिजोरी चाटूनपुसून खात आहेत!,” असा गंभीर आरोप केलेला आहे.

मनसेनेही महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप करत महापौरांनी पदाचा गैरवापर करून आपल्या मुलाला कंत्राट दिले आहे, त्याची चौकशी करावी अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. “कोरोना महामारीच्या काळात वरळीतील एनएससीआयडोम येथे उभारण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात होत असलेल्या भ्रष्टाचार व अनागोंदी कारभाराबाबत तक्रार मिळाली. सदर तक्रारीची शहनिशा केली असता शिवसेनेच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांचा मुलगा साईप्रसाद किशोर पेडणेकर व त्यांचे जावई गिरीश रमेश रेवणकर यांच्या कंपनीला तृतीय व चतुर्थश्रेणी कामगार पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले. कोणतीही निविदा प्रकिया न करता फक्त ई-कोटेशनच्या माध्यमातून ही कामे दिली गेलेली आहेत. महापौरांनी पदाचा गैरवापर करून दिलेल्या कंत्राटाची चौकशी करण्यात यावी, ही विनंती,” अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.

No comments to show.

Leave a Comment