Ads

--

बाप्पासाठी भाजप पदाधिका-याचे ‘असेही’ योगदान!

By Xtralarge News

August 21, 2020 7:03 pm

Ads

सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा अखंडित रहावी म्हणून 345 मंडळाना मोफत गणेशमुर्ती व पुजा साहित्य वाटप.

भाजपा पदाधिकारी मुरजी पटेल यांचा उपक्रम..

मुंबई, दि. 21 ऑगस्ट..
कोरोनामुळे गणेशोत्सवाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून भाजप पदाधिकारी मुरजी पटेल यांनी मुंबईतील 345 गणेशोत्सव मंडळांना त्यांच्या मागणीप्रमाणे गणेशमूर्ती, सर्व पुजेचे साहित्य मोफत उपलब्ध करुन दिले आहे. भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत गणेशमूर्तींचे वाटप करण्यात आले.

कोरोनामुळे यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आर्थिक दुष्ट्या अडचणीत आली. त्यामुळे उत्सव कसा साजरा करावा याबाबत चिंता होती. पण शासनाचे नियम पाळून उत्सवाची परंपरा कायम ठेवली जावी म्हणून भाजपा पदाधिकारी मुरजी पटेल यांनी पुढाकार घेतला. त्यांनी अंधेरी पुर्व विधानसभा मतदार संघातील तब्बल 345 मंडळांना गणेशमूर्ती व पुजेचे सर्व साहित्य देणगी स्वरूपात उपलब्ध करुन दिले. आज आमदार अँड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत त्याचे वाटप करण्यात आले.
याबाबत बोलताना मुरजी पटेल म्हणाले की, कोरोना मुळे गणेशोत्सव मंडळे अडचणीत होते. मुंबई हे उत्सवप्रिय शहर आहे. उत्सवातून एक आशावादी, सकारात्मक उर्जा मिळते. म्हणून कोरोनाशी लढताना वैद्यकीय मदत तर आम्ही देत आहोतच सोबत कोरोनाशी लढताना आपली गणेशोत्सवाची परंपरा अखंड रहावी म्हणून ही बाप्पाची सेवा आम्ही केली.

No comments to show.

Leave a Comment