Ads

---

उद्धव ठाकरे रविवारी संभाजीनगर दौऱ्यावर

By Xtralarge News

October 22, 2022 6:33 pm

Ads

उद्धव ठाकरे रविवारी संभाजीनगर दौऱ्यावर…

मुंबई, दि. 22 ऑक्टोबर :
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पहाणी करणारण्यासाठी माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या रविवारी संभाजीनगरला भेट देत आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानाची आढावा घेऊन त्यांना शासकीय मदत तातडीने मिळवून देण्यासाठी ते सहकार्य करणार आहेत.

मराठवाड्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे . हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे . त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे . तरीही राज्यकर्ते राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता नाही अशी जाहीर विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत . शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना तातडीने मदत कशी करता येईल याची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या रविवार दिनांक 23 ऑक्टोबर 22 रोजी संभाजीनगरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना शासकीय मदत लगेच कशी मिळवून देता येईल यासाठी ते शिवसेनेची यंत्रणा कार्यान्वीत करणार आहेत.

No comments to show.

Leave a Comment