Ads

--

मुंबईतील एअर इंडियाची इमारत राज्य सरकारला मिळणार !

By Xtralarge News

October 19, 2022 12:51 pm

Ads

मुंबईतील एअर इंडियाची इमारत राज्य सरकारला मिळणार !

मुंबई, दि. 19 ऑक्टोबर :
मुंबईतील एअर इंडियाची इमारत राज्य सरकारला द्यावी अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना केली. केंद्रीय मंत्र्यांनी ही इमारत महाराष्ट्र सरकारला देण्याची मागणी मान्य केली आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली

सध्या मंत्रालय आणि अ‍ॅनेक्स इमारत मिळून सुद्धा शासकीय कार्यालयांसाठी जागा अपुरी पडते, त्यामुळे एअर इंडियाच्या इमारतीची मागणी करण्यात आली. मी मुख्यमंत्री असताना हा प्रस्ताव आम्ही दिला होता. मात्र दरम्यानच्या काळात तो प्रस्ताव मागे पडला. त्यानंतर आम्ही पुन्हा पत्रव्यवहार केला. सध्या रिझर्व्ह बँक आणि महाराष्ट्र सरकार अशा दोघांनी या जागेची मागणी केली आहे.

आता केंद्र सरकारचे अधिकारी आणि आमचे मुख्य सचिव यासंदर्भात पुढील चर्चा करतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेने पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

No comments to show.

Leave a Comment