Ads

-

सर्व सरकारी नोकऱ्यांसाठी एकच CET !

By Xtralarge News

August 19, 2020 11:45 pm

Ads

मोदी सरकारचा मोठा निर्णय….

नवी दिल्ली, दि. 19 ऑगस्ट..

सरकारी नोकरीसाठी वेगवेगळ्या परीक्षा देण्याच्या कटकटीतून तरुणांची आता सुटका झाली आहे. मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत सरकारी नोकरीसाठी एकच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नोकरीसाठी वेगवेगळे अर्ज करा, वेगवेगळ्या परीक्षा द्या यातुन सुटका होणार आहे.

शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पोरांसाठी वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. प्रत्येक संस्था आणि कंपन्या आपल्या परीक्षा ठेवतात. नोकरीच्या महत्त्वाकांक्षेच्या दृष्टीने या सगळ्या परीक्षा द्याव्या लागतात  मात्र मोदी सरकारच्या निर्णयामुळे हे चित्र बदलण्याची चिन्हे आहेत.

सरकारी संस्थेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांसाठी एकच सामायिक परीक्षा (CET )घेतली जाईल. त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था (National Recruitment Agency) स्थापन करण्यात येणार आहे.ही संस्था सरकारी नोकऱ्यांसाठी लेखी परीक्षा घेईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना पात्रतेचे इतर सरकारी निकष पूर्ण केल्यास सरकारी सेवेत नोकरीची संधी मिळेल. स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून ३ वर्षांपर्यंत या निकालाआधारे नोकरीसाठी अर्ज करता येईल.

No comments to show.

Leave a Comment