Ads

---

भुजबळ शिवसेनेत असते तर नक्की मुख्यमंत्री झाले असते

By Xtralarge News

October 13, 2022 8:36 pm

Ads

भुजबळ शिवसेनेत असते तर नक्की मुख्यमंत्री झाले असते…

मुंबई, दि. 13 ऑक्टोंबर-
देशाचा व भुजबळांचा अमृतमहोत्सव हा योगायोग म्हणावा लागेल. कोणी तीन वर्षांपुर्वी सांगितले असते या सोहळ्याला मी उपस्थित राहिल तर कोणाचा विश्वास बसला नसता. पण नियतीच्या मनात हेच होतं. आज प्रत्येकाच्या हातात मशाल देण्याची गरज आहे. भुजबळ शिवसेनेत असताना मशाल चिन्हावर निवडून आले. <span;>भुजबळ हे न डगमगणारे व जिद्दिने उभे राहणारे वादळ आहेत.<span;> शिवसेनेत असते तर नक्की मुख्यमंत्री झाले असते, असे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

छगन भुजबळ यांच्या अमृतमोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, भुजबळांनी शिवसेना सोडली हा आमच्यासाठी मोठा धक्का होता. यातून सावरायला मोठा वेळ लागला. पण नंतर बर झालं तुम्ही मातोश्रीवर येत हे मतभेद मिटवले. हे पहायला मा हव्या होत्या असे सांगत. भुजबळ हे वयाने तरुण आहेत. सेनेमध्ये असताना कधी त्यांनी दुरुपयोग केला नाही. त्यांनी जिद्दिने वाटचाल केली.

अडीच वर्षांपुर्वी महाविकास आघाडीचा प्रयोग देशाने पाहिला. तुमचे मार्गदर्शन लाभले. पण सध्या वैचारीक उंची पहायला मिळत नाही. वैचारीक एफएसआय जादा असायला हवा. भुजबळ हे डगमगणारे व जिद्दिने उभे राहणारे वादळ आहे. आणखी लढाई लढायची आहे. पुढिल काळात देखील साथ सोबत राहु द्या. तुम्ही तुमची ७५ वर्ष पूर्ण केली. आता पुढच्या ७५ वर्षांनी पुन्हा बोलवा असे सांगत त्यांनी दीर्घायुश्याच्या भुजबळांना शुभेच्छा दिल्या.

No comments to show.

Leave a Comment