Ads

--

पंतप्रधान मोदी संविधानपूजक व डॉ. आंबेडकरांना मानणारे नेते !

By Xtralarge News

October 12, 2022 12:19 pm

Ads

पंतप्रधान मोदी संविधानपूजक व डॉ. आंबेडकरांना मानणारे नेते !
मुंबई, दि. 12 ऑक्टोबर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरे संविधानपूजक असून संविधानानुसार देश चालवीत आहेत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे नेते आहेत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या शासकीय निवासस्थानी बुद्ध मूर्ती आहे. मोदींच्या गावात वडनगर येथे ह्यू इन त्संग हे येऊन गेले होते. तिथे बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या वर बौद्ध धम्माचे संस्कार असून बौद्ध धम्म आणि आंबेडकरी विचार त्यांना उमगला असून त्यानुसार ते सर्वधर्मसमभाव मानणारे राष्ट्रीय एकात्मता मजबूत करणारे पंतप्रधान आहेत असे गौरव्दगार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काढले.

आम आदमी पक्षाच्या गुजरातचे अध्यक्ष गोपाल इटलीया यानी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल असंविधानिक शब्द उच्चारले आहेत. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. अरविंद केजरीवाल आणि त्यांची आम आदमी पक्षाची टीम ही घटनेची पायमल्ली करून एकात्मतेला धोका निर्माण करायचे काम करीत आहेत. त्यांना जनतेने धडा शिकविला पाहिजे असे रामदास आठवले म्हणाले.

दिल्लीतील मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी हिंदू धर्माविरुद्ध वक्तव्य केल्यानंतर उठलेल्या वादळामुळे त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. याप्रकरणी खरे तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोषी आहेत. भारतीय संविधानाने दिलेल्या सर्वधर्मसमभाव बंधुता सहिष्णुता या तत्वांना अरविंद केजरीवाल मानत नाहीत. त्यांनी आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांची वक्तव्ये ही एखाद्या धर्माविरुद्ध राहिली आहेत, अरविंद केजरीवाल हेच घटनाविरोधी आहेत.

देशात सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता वर्धित करून बंधुभाव वाढविला पाहिजे. त्यातूनच आपले सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मता मजबूत होईल. विविधतील आपली एकता टिकून आहे ती संविधानामुळे, संविधानातील मूल्यांमुळे. मात्र जर अरविंद केजरीवाल आणि त्यांचे आमदार एखाद्या धर्माविरुद्ध जाहीर बोलू लागले तर सर्वधर्मसमभाव या घटनेतील मूल्यकगी पायमल्ली होऊन सामाजिक ऐक्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे आशा प्रवृत्ती च्या अरविंद केजरीवाल यांना जनतेने धडा शिकविला पाहिजे, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला.

 

No comments to show.

Leave a Comment