Ads

-

दिव्यांगासाठी एक खिडकी योजना सुरू करणार

By Xtralarge News

October 10, 2022 3:06 pm

Ads

दिव्यांगासाठी एक खिडकी योजना सुरू करणार..
मुंबई, दि.१० ऑक्टोबर : –
दिव्यांगासाठी राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या सर्व योजना महापालिका क्षेत्रात एकाच ठिकाणी मिळण्यासाठी महापालिकेने कार्यवाही करावी असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

सेंट्रल व आर नॉर्थ वॉर्ड- बोरविली पश्चीम येथे पार पडलेल्या ‘पालकमंत्री आपल्या दारी’ या उपक्रमात मुंबई उपनगर चे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते.

महानगरपालिका क्षेत्रातील ४० टक्के पेक्षा जास्त अपंग असणा-या दिव्यांगाना शासनाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी मिळाल्या पाहिजेत  तसेच दिव्यांगासाठी स्टॉल देण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी तक्रार आर सेंट्रल वॉर्ड मधील इकबाल इब्राहिम शेख यांनी  मांडली त्याला उत्तर देताना मंत्री लोढा म्हणाले, दिव्यांगासाठी केंद्र, राज्य तसेच महापालिकेच्या योजना राबविण्यात येतात अशा वेळी, नागरिकांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात जावे लागू नये यासाठी महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना शासनाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश मंत्री लोढा यांनी दिले.

बोरीवली(पू) महाकालीनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणातंर्गत १५ वर्षे झाले तरी पूर्ण न झालेबाबत, रेल्वे,घनकचरा,पाणी वेळेत न येणे,नादुरूस्त स्ट्रीट लाईट दुरूस्त करून मिळाव्यात यासह  ३६९  विविध विषयांवर नागरिकांनी  आपल्या तक्रार अर्ज दिले.तर १०५ अर्जदारांनी पालकमंत्री यांच्या समोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.

‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रम दि. १२ ऑक्टो रोजी एल वॉर्ड- कुर्ला पश्चीम येथे असून. नियोजित रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन ही जिल्हाधिकारी : https://mumbaisuburban.gov.in  बृहन्मुंबई महानगरपालिका : portal.mcgm.gov.in वरील लिंक वरही ऑनलाइन तक्रार नागरिकांना करता येतील.

No comments to show.

Leave a Comment