Ads

-

बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

By Xtralarge News

October 8, 2022 3:32 pm

Ads

बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

मुंबई, दि. ८ ऑक्टोबर-

नाशिक – नांदूरनाका येथे झालेल्या खाजगी बसच्या भीषण दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला, या घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करून या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसेच अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

या घटनेची तातडीने दखल घेऊन नाशिक येथील दुर्घटनास्थळाला भेट देत प्रशासकीय अधिकारी वर्गाकडून मुख्यमंत्र्यांनी अपघाताबाबत सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर बस दुर्घटनेतील जखमींची मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात जाऊन आस्थेवाईकपणे विचारपूस करून संवाद साधला.

अपघाताच्या कारणांचा सर्वंकष चौकशीतून शोध घेतला जाईल. त्याबाबत सर्व यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. घटनास्थळावरील मदतीसाठी तसेच रूग्णालयातील उपचारासाठी सर्व यंत्रणा तातडीने कार्यान्वित व्हाव्यात यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.

No comments to show.

Leave a Comment