Ads

-

गेट वे समोरच्या ‘ध्वनी आणि प्रकाश शो’ चे काम पूर्ण करा

By Xtralarge News

October 7, 2022 2:12 pm

Ads

गेट वे समोरच्या ‘ध्वनी आणि प्रकाश शो’ चे काम पूर्ण करा :

मुंबई, दि. ७ ऑक्टोबर :-

पर्यटन विभाग, इंडियन ऑईल आणि बृहन्मुंबई महापालिकेने गेट वे ऑफ इंडिया येथील ‘ध्वनी आणि प्रकाश शो’ चे काम नियोजित वेळेत पूर्ण करावेत असे निर्देश पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत.

गेट वे ऑफ इंडियावर ‘ध्वनी आणि प्रकाश शो करण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागाने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) सोबत नुकताच करार केला आहे. या कराराच्या अनुषंगाने काम पुर्ण होण्याबाबत  मंत्रालयातील बैठकीत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते.

मंत्री लोढा म्हणाले, पर्यटन विभागाने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) सोबत गेटवे ऑफ इंडिया येथे ध्वनी आणि प्रकाश शो उजळण्यासाठी सामंजस्य करार  नुकताच केला. या शोमुळे गेट वे ऑफ इंडिया येथे भेट देणा-या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल. शिवाय स्थानिक संस्कृती देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना देखील माहिती होईल. मुंबई महापालिकेतंर्गत करण्यात येणारी कामे ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्यात यावीत. तसेच इंडियन ऑइल मार्फत करण्यात येणारी कामे देखील नियोजित वेळेत पूर्ण करावीत. यासाठी पर्यटन विभागाने सर्व परवानग्या घ्याव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या.

No comments to show.

Leave a Comment