Ads

--

कॅप्टन अमोल यादव यांची ‘स्वप्नपुर्ती’ लवकरच!

By Xtralarge News

August 18, 2020 9:42 pm

Ads

मुंबई, दि. १८ :

मुंबईच्या कॅप्टन अमोल यादव यांनी पाहिलेले स्वदेशी बनावटीचे विमान बनवण्याचे स्वप्न आता साकार होत आहे. दोन दिवसापूर्वीच त्यांनी बनवलेल्या विमानाची चाचणी यशस्वी झाली. आणखी दोन चाचण्या यशस्वी झाल्या की अमोल यांचे स्वप्न उंच भरारी घेईल. घराच्या छतावरच यादव यांनी हे विमान बनवण्याचे काम सुरू केलेले आहे. मिक इन इंडिया अंतर्गत त्यांनी हा प्रोजेक्ट सूरू केला असून त्यांना परवानग्याही मिळाल्या आहेत.

सरकारनेही त्यांना पाठबळ देऊ केले आहे. कॅप्टन अमोल यादव यांच्या पुढील प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

कॅप्टन अमोल यादव यांनी मोठ्या कष्टाने भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्यांचे प्रात्यक्षिक देखील यशस्वी झाले आहे. यापुढे नागरी उड्डयण मंत्रालयाची (डीजीसीए) मान्यता मिळाल्यानंतर पुढील प्रकल्पासाठी उद्योग विभागाच्यावतीने सर्व सहकार्य केले जाईल. त्यांना प्रकल्प उभारण्यासाठी जागा दिली जाईल.
कॅप्टन अमोल यांचा प्रकल्प लागु करण्यासाठी उद्योग विभागाच्यावतीने एक बैठक घेतली जाईल. यामध्ये एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. शासनाकडून उद्योगांसाठी दिले जाणारे प्रोत्साहन कॅप्टन अमोल यांच्या प्रकल्पाला दिले जाईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
एका मराठी माणसाने विमान तयार करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरविले आहे, त्याचा सर्वांना अभिमान आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकल्पाचे कौतुक केले आहे. यापुढे देखील राज्य शासन त्यांना सर्व सहकार्य करेल, असे उद्योगमंत्री देसाई म्हणाले.

लवकरच एका मराठी माणसाने पाहिलेले हे स्वप्न आकाशात भरारी घेईल. अमोल यादव यांच्या या प्रकल्पाला आमच्याही शुभेच्छा.

No comments to show.

Leave a Comment