Ads

--

मुख्यमंत्री बनवण्याची किंमत फॉक्सकॉनच्या रूपाने वसूल

By Xtralarge News

September 14, 2022 1:46 pm

Ads

मुख्यमंत्री बनवण्याची किंमत फॉक्सकॉनच्या रूपाने वसूल..

मुंबई दि. १४ सप्टेंबर: –

वेदांत फॉक्सकॉनने महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये २० अब्ज डॉलरचा प्रकल्प उभारत असल्याचे समोर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे हित साधत आहेत की गुजरातचे हित साधत आहेत असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी वेदांत फॉक्सकॉनशी योग्य संवाद व चर्चा केली होती आणि तळेगावचे ठिकाण निश्चित करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारने स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने वेदांत फॉक्सकॉनला सर्वोत्तम प्राधान्य दिले होते. वेदांत फॉक्सकॉनसह व्यवसायाच्या संधीची वाट पाहणाऱ्या अनेक लहान उद्योजकांची साखळी आता पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

नव्याने स्थापन झालेल्या ईडी सरकारला महाराष्ट्रात वेदांत फॉक्सकॉन कायम ठेवता आला नाही ही लाजिरवाणी गोष्ट असून मुख्यमंत्री शिंदे यांची राज्याच्या विकासाबाबतची उदासीनवृत्ती दिसून येते. गुजरातला बळी पडून एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे आर्थिक नुकसान आणि लाखो इच्छूक तरुणांचे रोजगार बुडवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील जनतेला आपल्या बंडाचे समर्थन करण्यात व्यस्त असून रोजगार आणि औद्योगिकीकरणासारख्या विकासाच्या मुद्द्यांवर ते बोलत नाहीत. महाराष्ट्रातील जनतेला तरुणांचे रोजगार घालवल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

No comments to show.

Leave a Comment