Ads

-

दहिहांडीच्या माध्यमातून शिवसेनेला शह देण्याचा भाजपाचा प्रयत्न

By Xtralarge News

August 18, 2022 2:52 pm

Ads

दहिहांडीच्या माध्यमातून शिवसेनेला शह देण्याचा भाजपाचा प्रयत्न..

मुंबई, दि: १८ ऑगस्ट:-

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने कंबर कसली असून दहिहांडी हा मुंबईतील महत्वाचा उत्सवातही उडी घेऊन मोठ्या प्रमाणात दहिदांडी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दहिदांड्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शह देण्याचा भाजपाचा प्रयत्न असून आ. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील जांभोरी मैदानावर भाजपा दहिहांडी साजरा करत आहे.

मुंबई भाजपातर्फे ३७० ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून वरळी विधानसभा मतदारसंघातील जांबोरी मैदानातून मेगा दहीहंडी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. त्याचबरोबर १ हजार मंडळांच्या ५० हजार गोविंदांना १० लाखाचे विमा कवच देण्यात आले आहे. याखेरीज मुंबईतील भाजप नेत्यानी वैयक्तिक पातळीवरही मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे अशी माहिती मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

मुंबई भाजपाकडून विविध ठिकाणी दरवर्षी दहीहंडीचे आयोजन केले जाते. मुंबईतील सण उत्सव आणि परंपरा जपण्यासाठी भाजपाच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जातात. भाजपकडून आयोजित सराव शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परवा  तब्बल १२० हून अधिक गोविंदा पथक शिबिरात सहभागी झाले होते. प्रत्येकाने साधारण पाच ते सहा थर रचून सलामी दिली. प्रत्येक पथकाला बक्षिसाने गौरवण्यात आले. यंदाची दहीहंडी महापालिकेतील भ्रष्टाचारमुक्तीची असणार आहे अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

No comments to show.

Leave a Comment