Ads

--

मुंबई महानगरपालिका प्रभाग रचना काही पक्षांच्या सोईच्या !

By Xtralarge News

August 8, 2022 12:13 pm

Ads

मुंबई महानगरपालिका प्रभाग रचना काही पक्षांच्या सोईच्या !

मुंबई, दि. 8 ऑगस्ट:

शिंदे/फडणवीस सरकारने मुंबई महानगरपालिका प्रभाग रचना २३६ वरून पुन्हा २२७ केली असून ही बाब अत्यंत निंदनीय आहे. राज्यात प्रत्येक पक्ष मनमानी करत निर्णय बदलत आहेत, यात निवडणुक आयोगाने लक्ष द्यावे असे अशी विनंती आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी निवडणूक आयोगाला केली आहे .

राज्यात सत्तेवर येणार्‍या प्रत्येक राजकीय पक्ष कोणताही विचार न करता निर्णय घेत आहे. त्यांच्या राजकीय हितसंबंधांसाठी प्रभाग सीमांशी खेळणे दुर्दैवी बाब आहे. ही लोकशाहीची थट्टा नाही का? राजकीय पक्षांना त्यांच्या निवडणुकीला साजेशा पद्धतीने प्रभाग सीमा करण्याचा अधिकार कसा असू शकतो? असा सवाल प्रीती शर्मा यांनी उपस्थित केला.

मुंबईचे किती वॉर्ड असू शकतात हे ठरवण्याचे सूत्र सत्ताधारी पक्षाचे केवळ राजकीय यश कसे असू शकते? बीएमसी वॉर्ड २२७ वरून 236 पर्यंत वाढवून शहराची लोकसंख्या वाढवण्याचे औचित्य साधले असेल तर आता ती लोकसंख्या गेली कुठे? आता फडणवीस पुन्हा सत्तेत आल्याने ते हवेत विरले आहेत का? अशी टीका प्रीती शर्मा मेनन यांनी केली.

राज्य निवडणूक आयोगाला या प्रक्रियेबाबत काहीही म्हणणे नाही, हे जाणून घेणे अत्यंत त्रासदायक आहे. राज्य निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थेला नेमके कोणते अधिकार आहेत? ते फक्त प्रशासकीय? तो एक घटनात्मकदृष्ट्या अनिवार्य स्वतंत्र अधिकार नसावा, की आपल्या लोकशाहीचे रक्षण करते? असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

No comments to show.

Leave a Comment