Ads

--

आमदार संतोष बांगरांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा

By Xtralarge News

July 16, 2022 4:23 pm

Ads

आमदार संतोष बांगरांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा..

मुंबई, दि १६ जुलै :-

शिवसेना बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी सह्याद्री अतिथीगृहात आपल्या समर्थकांसह शक्तीप्रदर्शन करुन राजशिष्टाचार कायदा मोडल्याने राजशिष्टाचार विभागाने संतोष बांगर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

सह्याद्री अतिथीगृहाचा वापर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल व राज्याने निमंत्रित केलेल्या पाहुण्यांसाठी आणि प्रशासकीय कामासाठी केला जातो मात्र असे असताना आमदार संतोष बांगर यांनी आपल्या समर्थकांसह शक्तीप्रदर्शन केले. हे शक्तीप्रदर्शन करण्याचे व्यासपीठ नसताना तसा प्रकार जाणुनबुजुन करण्यात आला ही चुकीची घटना आहे.आमदार संतोष बांगर यांनी कायद्याचे उल्लंघन केले असल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असेही महेश तपासे यांनी म्हटले आहे.

No comments to show.

Leave a Comment