Ads

--

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव

By Xtralarge News

July 16, 2022 2:51 pm

Ads

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव

मुंबई, दि. १६ जुलै;

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ” असे नामकरण करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

नवी मुंबई विमानतळाला ठाकरे सरकारने २९ जून २०२२ च्या मंत्रिमंडळत बैठकीतच मान्यता दिली होती पण ती रद्द करून पुन्हा नव्याने शिंदे सरकारने नामकरणास मान्यता दिली. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार 12.56 योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्व. पाटील यांचे योगदान आहे. तद्नंतर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित जमिनीसाठी मोबदला ठरावाच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेले 22.5% योजनेचे धोरण सुद्धा 12.5% धोरणाच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे.

नवी मुंबई येथे सिडको महामंडळाच्या माध्यमातून 1160 हे. क्षेत्रावर सार्वजनिक खाजगी भागीदारीतून ग्रीनफील्ड विमानतळ विकसीत करण्यात येत आहे. या संपूर्ण 1160 हे. जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे प्रगतीपथावर आहेत. या विमानतळाच्या नामकरणाच्या अनुषंगाने नवी मुंबईमधील विविध संघटना व राजकीय पक्षांकडून मागणी करण्यात येत होती. नवी मुंबई परिसरातील विकासामधील दि. बा. पाटील यांचे योगदान व स्थानिकांच्या विविध संघटनांची मागणी विचारात घेता नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण “लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे करण्यास मान्यता देण्यात आली.

No comments to show.

Leave a Comment