Ads

--

महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपये तर डिझेलमध्ये ३ रुपयांची कपात

By Xtralarge News

July 14, 2022 6:31 pm

Ads

महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपये तर डिझेलमध्ये ३ रुपयांची कपात…

गुरूवार, दि. १४ जुलै :

राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने जनतेला दिलासा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या करात पाच रुपये प्रति लीटर आणि डिझेलच्या करात तीन रुपये इतकी कपात करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून ही कर कपात आज मध्यरात्रीपासून लागू होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्य सरकारने राज्यातील पेट्रोलच्या करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या कर कपातीमुळे राज्यातील जनतेला महागाईपासून दिलासा मिळेल. आजच्या कर कपातीच्या घोषणेमुळे राज्यावर ६ हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

मुंबईत सध्या पेट्रोल १११ रुपये लिटर तर डिझेल ९७ रुपये लिटर होते या कर कपातीमुळे आता पेट्रोल १०६ रुपये तर डिझेल ९४ रुपये लिटर होईल. याआधी ठाकरे सरकारने पेट्रोलच्या व्हॅटमध्ये २ रुपये तर  डिझेलच्या व्हॅटमध्ये १.४४ रुपयांची कपात केली होती.

No comments to show.

Leave a Comment