Ads

-

राज्यपाल कोश्यारींची किल्ले प्रतापगडाला भेट

By Xtralarge News

May 6, 2022 11:08 am

Ads

राज्यपाल कोश्यारींची किल्ले प्रतापगडाला भेट..

सातारा दि. 6 मे :
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी किल्ले प्रतापगडला भेट देऊन शिवकालीन इतिहास जाणून घेतला. यावेळी राज्यपाल यांनी श्री भवानी मातेचे दर्शन घेऊन मनोभावी पुजा केली व किल्ले प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळ्यास अभिवादन केले.

प्रतापगड माची येथील शिवकालीन खेडेगाव व हस्तकला केंद्रास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली. शिवकालीन खेडेगाव भेट देवून शिवकालीन इतिहासाची प्रत्यक्ष अनुभुती मिळाली. हे स्थळ प्रेरणा देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या वीर सैनिकांना अभिवादन अशा भावना त्यांनी या भेटी प्रसंगी व्यक्त केल्या. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सनसेट पॉईंटला भेट दिली. याभेटी प्रसंगी पर्यटनासाठी आलेल्या लहान मुलांशी त्यांनी संवादही साधला.

यावेळी किल्ले प्रतापगड येथील ग्रामस्थांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे स्वागत केले.

No comments to show.

Leave a Comment