Ads

-

संजय राऊतांना ईडीचा दणका, संपत्ती जप्त !

By Xtralarge News

April 5, 2022 5:51 pm

Ads

संजय राऊतांना ईडीचा दणका, संपत्ती जप्त !

मुंबई, दि. ५ एप्रिल;

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने आज कारवाई करत मोठा दणका दिला. संज राऊत यांचे अलिबागमधील ८ प्लॉट व दादरमधीली राहते घर(फ्लॅट) ईडीने जप्त केले आहे. पत्राताळ प्रकरणी ही कारवाई केल्याचे समजते.

केंद्रीय तपास यंत्रणा विरुद्ध महाविकास आघाडी सरकार या वादात आता संजय राऊत यांच्यावर ईडीने थेट कारवाई केली आहे.  मुंबईतील १ हजार ३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. यासंदर्भात ईडीने कारवाई केली आहे.

ईडीचे काही अधिकारी भ्रष्ट मार्गाने पैसे कमावत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन केला हता तसेच ही कागदपत्रे त्यांनी मुंबई पोलिसांकडेही दिली होती. त्यावर महिनाभर काहीच कारवाई झाली नाही पण आज सकाळी त्यासंदर्भात एसआयटी स्थापन केल्याची घोषमा गृहमंत्री वळसे पाटील यांनी करताच ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

No comments to show.

Leave a Comment