Ads

-

एकदा ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमा बघाच !

By Xtralarge News

March 30, 2022 1:52 pm

Ads

एकदा ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमा बघाच !

जयंतराव पाटलांचा इस्त्रायलच्या अधिकाऱ्याला सल्ला..

मुंबई, दि. 30 मार्च :
इस्रायल दुतावासातील अधिकाऱ्याला ‘सुपर डुपर हिट’ असलेला ‘अशीही बनवाबनवी’ हा मराठी सिनेमा पाहण्याचा सल्ला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी दिला आहे.

जगभरातील लोकांचे भारतीय सिनेसृष्टीवर असलेले प्रेम काही नवे नाही. भारतीय सिनेसृष्टीवर प्रेम करणारा माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला सापडेलच. अशाच भारतीय सिनेसृष्टीची भुरळ पडलेले इस्त्रायल दुतावासातील अधिकारी कोबी शोशानी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली.

कामानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांची भेट घेण्यासाठी आलेल्या कोबी शोशानी यांनी जयंतराव पाटलांना  भारतीय सिनेमाबाबत असलेल्या प्रेमाबद्दल सांगताच जयंतराव पाटलांनी त्यांना काही चित्रपट पाहण्याचा सल्ला दिलाच. शिवाय दिलखुलास स्वभाव असणार्‍या जयंतराव पाटील यांनी यावर दाद दिली नाहीत तर ते जयंतराव कसले ! जयंतरावांनी कोबी यांना ‘अशीही बनवाबनवी’ हा मराठी सिनेमा पाहण्याचा सल्ला देतानाच या मराठी सिनेमात इस्त्रायलचा उल्लेख असल्याचेही नमूद केले.

No comments to show.

Leave a Comment