Ads

--

हिंमत असेल तर रिसॉर्ट तोडून दाखवा !

By Xtralarge News

March 26, 2022 7:38 pm

Ads

हिंमत असेल तर रिसॉर्ट तोडून दाखवा !

मुंबई, दि. २६ मार्च:

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टवरून राजकीय वातावरण तापले आहे. हे रिसॉर्ट बेकायदेशीर असून ते पाडावे यासाठी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या गाड्यांचा ताफा व कार्यकर्ते घेऊन दापोलीला गेलेत तर हिम्मत असेल तर रिसॉर्ट पाडून दाखवा असे आव्हान अनिल परब यांनी सोमय्या यांना दिले आहे.

यासंदर्भात बोलताना अनिल परब म्हणाले की,हे रिसॉर्ट माझे नाही. याबाबत चौकश्या झाल्या आहेत. वेगवेगळ्या यंत्रणांकडून सर्व कागदपत्रे तपासून झाली आहेत. किरीट सोमय्या हे माझे रिसॉर्ट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे त्यांनी कागदोपत्री सिद्ध करावे. किरीट सोमय्या पालिकेचे नोकर आहेत का, ते कारवाई करुन तोडण्यासाठी जाणार आहेत. एखादी अनाधिकृत गोष्ट असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचा पालिकेला अधिकार आहे. रिसॉर्ट परवानगी घेऊन बांधले नसेल तर त्यावर कारवाई होईल. पण माझे नाव जोडून सोमय्या वातावरण खराब करण्याचे काम करत आहेत.

न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. माझा संबंध नसताना वारंवार आरोप करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने उच्च न्यायालयात जाणार आहे. कायदेशीर परवानगी घेऊन बांधकाम झाले असेल तर परवानगी ज्यांनी दिली त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी, असेही अनिल परब म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment