Ads

-

एलपीजी गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागला

By Xtralarge News

March 22, 2022 3:53 pm

Ads

एलपीजी गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागला..

नवी दिल्ली, दि. २२ मार्च:

अखेर पुन्हा एकदा तुमच्या खिशाला कात्री लागणार असून पेट्रोल व डिझेल ८० पैशांनी महाग झाले असून स्वयंपाकाचा गॅस ५० रुपयांनी महाग झाला आहे. निवडणुकीच्या धामधुमीत जनतेच्या रोषाला सामोरे जाऊ लागू नये म्हणून भाववाढीला ब्रेक दिला होता परंतु निवडणुकी होताच इंधन दरवाढ करण्यात आली.

मुंबईत आज पेट्रोलचा दर १०९ रुपये ९८ पैशांवरुन वाढून प्रतीलिटर ११० रुपये ८२ पैसे झाला तर डिझेल ९५ रुपयांवर पोहोचले. १४ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी ९४९ रुपये ५ पैसे मोजावे लागत आहेत. तर मुंबईत आता ९४९ रुपये ५ पैसे मोजावे लागणार आहेत. कालच सीएनजीच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे.

डिझेलची ठोक खरेदी करणाऱ्यांनाही प्रति लिटरमागे २५ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. यातील रेल्वे, एस टी महामंडळे, सिमेंट कंपन्या, वीज निर्मिती प्रकल्प, यांना हे डिझेल महाग खरेदी करावे लागणार असले तरी त्याचा भार शेवटी सामान्य माणसांवरच पडणार आहे.

No comments to show.

Leave a Comment