Ads

-

मुंबईतील गावठाण, कोळीवाडयांचे सिमांकन तातडीने करा

By Xtralarge News

March 22, 2022 12:01 pm

Ads

मुंबईतील गावठाण, कोळीवाडयांचे सिमांकन तातडीने करा..

मुंबई, दि. 22 मार्च:
मुंबईतील सायन, कुलाबा, धारावी, प्रिंसेस डॉक, वरळी, शिवडी, माहिमसह ८ कोळीवाडयांचे सिमांकन करण्याचे काम रखडले असून याबाबत महापालिकेने महसूल विभागाचा अभिप्राय नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यात भाजपा सरकार असताना हे काम सुरू झाले होते मात्र सध्या या कारणास्तव हे काम बंद असून जो पर्यंत सिमांकन होत नाही तोपर्यंत यांच्या घरांचा पुर्नविकास होऊ शकणार नाही. त्यामुळे मुंबईतील सर्व गावठाण, कोळीवाडयांचे सिमांकन तातडीने करण्यात यावे, अशी मागणी आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली.

खार दांडा कोळीवाडयातील मासे सुकवण्यासाठी वापरात असलेल्या मोकळया जागेवर शासनातर्फे जसानी रिॲलिटी तर्फे एसआरए योजना राबविण्यात येत असून ही जागा कोळी बांधवांसाठी राखीव ठेवण्यात यावी तसेच याच कोळीवाडयामध्ये जूहू कोळवाडा येथे पंपिंग स्टेशन उभारताना बाजूला मोकळी जागा शिल्लक असून ही जागा कोळी बांधवांसाठी मासे सुकवण्यासाठी, बोटी नांगरण्यासाठी, बोटी दुरूस्तीसासाठी, जाळी विणण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात यावी.

वरळीच्या कोळीवाडयातील बांधव गेले अनेक दिवस कोस्टल रोडच्या दोन खांबातील अंतर १६० मिटर असावे म्हणून आंदोलन करीत आहेत. जर हे अंतर १६० मिटर नसेल त्यांना त्यांच्या बोटी समुद्रात घेऊन ये-जा करणे शक्य होणार नाही. त्यांचा मासेमारीचा व्यवसाय धोक्यात येईल. महापालिकेने जो अहवाल सादर केला त्यामध्ये जे नमुद केले आहे, त्यानुसार ही मागणी कोळी बांधव करीत असून शासनाने यांच्या मागणीकडे लक्ष दिलेले नाही त्यामुळे याबाबत तातडीने लक्ष देण्यात यावे अशी मागणी आमदार शेलार यांनी यावेळी केली.

मुंबईतील ५० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका घेण्यासाठी शासनाने जो नविन उपविधी जाहीर केला आहे तो जाचक तर आहेच शिवाय तो वेळ आणि पैशाचा अपव्यय करणारा आहे. त्यामुळे गृहनिर्माण सोसायटयांमध्ये असंतोष असून त्यांच्या निवडणुका जुन्याच पध्दतीने घेण्यात याव्यात. मुंबईतील मान्यता प्राप्त अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग अद्याप लागू करण्यात आलेला नाही तो लागू करावा अशी मागणीही त्यांनी केली.

No comments to show.

Leave a Comment