Ads

--

देवेंद्र फडणवीस, हाजीर हो !

By Xtralarge News

March 12, 2022 3:37 pm

Ads

देवेंद्र फडणवीस, हाजीर हो !

मुंबई, दि. १२ मार्च:

माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी मुंबई पलिसांनी नोटीस पाठवली आहे. १३ तारखेला सकाळी ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितले आहे. पोलीस बदली घोटाळ्याप्रकरणी ही नोटीस पाठवलेली आहे.

पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई पोलिसांनी मला नोटीस पाठवली असून बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला ११ वाजता बोलावले आहे. महाविकास आघाडी सरकारचा गृह विभागातील बदल्यांचा महाघोटाळा बाहेर काढला होता. त्याचे ट्रान्सक्रीप्ट्स, पेनड्राइव्ह हे सगळे माझ्याकडे आहे हे मी सांगितले होते आणि ते मी देशाच्या गृहविभागाच्या सचिवांकडे सुपूर्द करत असल्याचेही मी त्यावेळी नमूद केले होते. त्यानुसार जी काय या घोटाळ्याची सगळी माहिती माझ्याकडे होती ती त्याच दिवशी मी दिल्लीला जावून गृहसचिव यांना दिली. सीबीआय या घोटाळ्याची चौकशी करत आहे.

हे प्रकरण ज्यावेळी सीबीआयकडे गेले त्यावेळी राज्य सरकारने आपला घोटाळा दाबण्यासाठी एक एफआयआर दाखल केला आणि ऑफिशयल सिक्रेट अॅक्ट मधली माहिती लिक कशी झाली? अशा प्रकारचा एफआयआर नोंदवला आहे. या एफआयआरच्यासंदर्भात मला पोलिसांकडून उत्तर मागितले गेले. मी त्यांना एक उत्तर दिले होते. विरोधी पक्षनेता म्हणून माझा विशेषाधिकार आहे. माझी माहिती कुठून आली, याचा प्रश्न मला विचारला जाऊ शकत नाही असे फडणवीस म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment