Ads

-

बाबाजी दाते महिला बँकेवर प्रशासक नेमून चौकशी करा !

By Xtralarge News

March 12, 2022 11:04 am

Ads

बाबाजी दाते महिला बँकेवर प्रशासक नेमून चौकशी करा !

मुंबई, दि. १२ मार्च:
यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँक बँकेत बोगस कर्जवितरण करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने या बँकेवर निर्बंधही लावले आहेत.या बँकेत हजारो गुंतवणूकदारांचा पैसे असून बँकेतील अनियमिततेमुळे गुंतवणुकदारांचा पैसा अडकला आहे. या बँकेवर प्रशासक नेमूक तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
विधानसभेत लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून नाना पटोले म्हणाले की, बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत अनेकांच्या नावाने परस्पर कर्ज उचल्याचे उघड झाले आहे. बँकेने या लोकांकडून कर्जवसुलीसाठी संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर हे बोगस कर्जवाटप प्रकरण उघडकीस आले, पोलिसांमध्ये तक्रारी देण्यात आल्या तेव्हा परस्पर हे कर्ज भरण्यात आले. ज्यांनी या बँकेतून कर्जच काढले नाही त्यांच्या नावे कर्ज काढले गेले आहे. लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ही गंभीर बाब आहे. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पतीने अशा प्रकरणाची बोगस विनातारण कर्ज मोठ्या प्रमाणात वितरीत केली, ओटीएस योजनाही चुकीच्या पद्धतीने राबविली आहे, असे चौकशी अहवालतच नमूद केलेले असताना मंत्री महोदय आणखी दोन महिने कशासाठी सांगत आहेत? या घोटळेबाजांना कोण पाठीशी घालत आहेत? याची चौकशी झाली पाहिजे आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी संचालक मंडळाची संपत्ती जप्त करुन पैसे परत देणार का? असे प्रश्न उपस्थित करत या बँकेवर प्रशासक नेमून तात्काळ चौकशी करा, अशी मागणी करण्यात आली.
सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी उत्तर देताना सांगितले की, या बँकेतील बोगस कर्जवाटप प्रकरण उघड झाले आहे, विनातारण कर्ज दिले आहे, ओटीएस योजनाही चुकीच्या पद्धतीने राबिवण्यात आले, कर्ज वसुलीसाठी प्रयत्न केले नाहीत हे आढळून आले आहे. कलम ८३ अन्वये कारवाई सुरु आहे. दोन महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगितलेले आहे. अहवाल येताच पुढील कारवाईही केली जाईल, असे अश्वासन मंत्री महोदयांनी दिले.

No comments to show.

Leave a Comment