Ads

--

उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणे चुकीचे

By Xtralarge News

March 11, 2022 4:46 pm

Ads

उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणे चुकीचे..

मुंबई दि. ११ मार्च

जंगजंग पछाडूनही महाविकास आघाडी सरकार पडत नाही हे भाजपच्या लक्षात आले आहे. महाराष्ट्राची मानसिकता वेगळी आहे. महाविकास आघाडी सरकारला धोका नाही परंतु उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणे चुकीचे आहे, टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे.

जयंत पाटील म्हणाले की, सर्व पक्ष उत्तरप्रदेशमध्ये एकवटले असते तर विजय झाला असता. भाजपच्या हातातूनही अनेक राज्य गेली. उत्तर प्रदेशात मायावती यांच्या बसपाला मतं चांगली मिळाली आहेत. गोव्यात आमचे फारसे नेतृत्व नव्हते, काँग्रेस सोबत येईल याची आम्ही वाट पाहत होतो. देश चालवायची जी चुकीची पद्धत आहे त्याचा विरोध करायला हवा त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे.

भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करायला हरकत नाही परंतु भाजपमधील लोकांवरही कारवाई व्हावी. आम्ही भाजपची यादी दिली आहे. यंत्रणांवर दबाव आणण्याचे कारण नाही पण ६ वाजता समन्स न देता नवाब मलिक यांना घेऊन गेले. आता केंद्रीय यंत्रणा आक्रमक होतील की पक्ष हे पाहावे लागेल, असा स्पष्ट इशाराही जयंत पाटील यांनी दिला.

No comments to show.

Leave a Comment