मराठी भाषा दिनानिमित्त भाजपातर्फे गिरगावात मराठी कट्टा…
मुंबई, दि. 28 फेब्रुवारी:
ज्या ऐतिहासिक चाळीत आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके वास्तव्यास होते तसेच चाळीतील गणेशोत्सवाला लोकमान्य टिळकांनी स्वतः भेट देऊन प्रोत्साहन दिले त्या चाळीतील मराठी कट्टा म्हणजे या चाळीतील मराठीपणाला नमन करायला आलो आहे
असे भाजपा आमदार आशिष शेलार म्हणाले.
मराठी भाषेच्या निमित्ताने गिरगावातल्या ऐतिहासिक जगन्नाथ चाळीत भाजपातर्फे मराठी कट्टा आयोजित करण्यात आला होता. भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी यावेळी संवाद साधत मुंबईतील मराठी माणसाचे प्रश्न मांडले व मराठी विषयाला मुद्देसूद हात घालून उपस्थितींंची मने जिंकले.
भाजपातर्फे मुंबईत ठिकठिकाणी मराठी कट्टा आयोजित करण्यात येत असून त्या श्रुंखलेतील एक कट्टा फणसवाडीतील जगन्नाथ चाळीत पार पडला.
यावेळी नगरसेविका रिटा मकलाना, आकाश पुरोहित, जिल्हा अध्यक्ष शरद चिंतनकर, कमलाकर दळवी आदी उपस्थितीत होते.
Leave a Comment